वीज महावितरणाने कानावर ‘हात’ ठेवले, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांच्या अर्जाची चौकशी करण्याची मागणी
साईमत/न्यूज नेटवर्क/अडावद, ता.चोपडा : येथील वीज महावितरणाचा भोंगळ कारभार हा दर दिवसाला चव्हाट्यावर येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे.अशातच 24 तासात दिवसाला व रात्री अधून-मधून आठ तासावर वीज गुल असते. असा प्रकार सध्या अडावद वीज महावितरणमध्ये सुरु आहे. याकडे वरिष्ठ लक्ष देतील का? त्यांच्या सुट्ट्यांचा अर्ज आहे की नाही, त्याची चौकशी करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुसरीकडे वीज महावितरणाने कानावर ‘हात’ ठेवले आहेत.
अडावदला कुठे जीर्ण तार तुटतात तर कुठे रोहित्रे आवाज करते. असे सर्व सुरु असताना जर परमिट कोणी वायरमॅनने घेतले असेल तर वीस मिनिटाच्या कामाला एक तास लावतात. जर कोणी त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल केला तर लवकर कॉल उचलत नाही. बोलताना काय काम आहे, असे विचारत नाही. ‘तुला माझा नंबर कोणी दिला’, असे धमकावून बोलतात. ‘तुला ज्याने नंबर दिला थांब त्याच्याशी बोलतो त्याने माझा नंबर तुला का दिला’ असे धमकावल्यासारखे बोलतात आणि काय काम आहे हे बोलणे टाळतात. गाव मोठ आहे, कुठे ना कुठे, काही ना काही समस्या असणारच हे निश्चित आहे. पण ज्यांना महावितरणने कामावर ठेवले आहे. त्यांनाच गावातील ग्रामस्थ फोन करतील. त्यासाठी ग्रामस्थ काही वायरमन लोकांना फोन करतात तर त्यांना काम करायचा राग येतो, म्हणून ते लोकांना फोनवर रागवितात आणि काम चुकारपणा करतात. त्यामुळे अर्धा तासाच्या कामाला दोन तास लावतात. त्यामुळे जनतेचे वीज नसल्याने हाल होत आहेत.
विजेअभावी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कामात खोळंबा
विजेच्या लपंडवामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे संगणक चालकांच्या दुकानावर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. असे अनेक व्यवसाय आहेत, त्यांचे कामे होत नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागते. त्यात महावितरणाच्या ऑफिसच्या मोबाईलवर कॉल करायचा विचार केला तर एक-एक तास मोबाईल व्यस्त असतो. दुसरीकडे वरिष्ठांना जनता कॉल करत नाही आणि काही वायरमन लोकांच्या सुट्टीला तोंडी मंजुरी दिली जाते. कोणत्याच प्रकारचा सुट्टीचा अर्ज ऑफिसला नसतो. ज्याला वाट्टेल तेव्हा सुट्टी मारायची आणि इकडे जनता वाऱ्यावर सोडायची हद्द पार केली आहे.
तीन महिने उलटूनही डिमांडनोटचा अर्ज उपलब्ध नाही
एका ग्राहकाला तीन महिने उलटूनही डिमांडनोटचा अर्ज उपलब्ध होत नाही. त्यासाठी वरिष्ठांशी बोललो की वायरमनशी बोला, त्यांच्याशी बोलले का माझ्या नंबरवर का कॉल केला आणि माझा नंबर कोणी दिला, त्याला बघतो, अशी दादागिरीची भाषा वापरली जात असल्याचाही सूर ग्रामस्थांमधून ऐकावयास मिळत आहे.