अभिनेत्री शर्लिन चोप्रा राहुल गांधींबरोबर लग्नास तयार

0
12

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा तिच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. शर्लिन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. मात्र, सध्या शर्लिन आपल्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. शर्लिनने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र, यासाठी तिने एक अटही ठेवली आहे. शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शर्लिनला पैपराजींनी राहुल गांधींबरोबर लग्न करशील का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देत शर्लिन म्हणाली, हो मी राहुल गांधींशी लग्न करु शकते पण लग्नानंतर मी माझे अडनाव बदलणार नाही.शर्लिनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे मात्र, अद्याप शर्लिनच्या या वक्तव्यावर राहुल गांधींकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शर्लिन ‌‘पौरुषपूर’ बेवसिरीजमध्ये झळकली आहे. २८ जुलैला ही व्ोबसिरीज प्रदर्शित झाली आहे. या व्ोबसिरीजमध्ये शर्लिनने महाराणी स्नेहलताची भूमिका साकारली आहे. शर्लिन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. शर्लिनने ‌‘दोस्ती: फ्रेंड्स फॉरएवर’, ‌‘रेड स्वास्तिक’, ‌‘वजह तुम हो’ सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here