साईमत, मुंबई : प्रतिनिधी
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे गुरूवारी वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी सकाळी ७ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांनी अनेक मराठी, िंहदी चित्रपटांमध्ये काम केले. १९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या आलिया भोगासी या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केले. सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते. त्यांचे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले. सीमा आणि रमेश देव यांचा मुलगा अिंजक्य देव हा देखील मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ होते. सीमा देव आणि रमेश देव यांनी १ जुलै, १९६३ रोजी लग्नगाठ बांधली. वरदक्षिणा, अपराध या चित्रपटांमध्ये सीमा आणि रमेश देव यांनी एकत्र काम केले होते. सीमा देव आणि रमेश देव यांच्या जोडीला प्रेक्षकांची
पसंती मिळाली.