भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एसबीआय बँकेजवळ गांजाचा नशा करणाऱ्या एका तरूणावर रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी तरूणावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, भुसावळ शहरातील एसबीआय बँकेजवक एक जण गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ बाजार पेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता पोलिसांनी गांजाचा नशा करणारा शेख रमजान शेख रउफ (वय ३८, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) याच्यावर कारवाई केली. त्यांच्याजवळून नशा करण्याचे साधन हस्तगत केले. पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख रमजान शेख रउफ याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ.रमण सुरळकर करीत आहे.