Bhilati Area Of ​​Mehrun : मेहरूणमधील भिलाटी भागात दहशत माजविणाऱ्यांवर कारवाई

0
28

एकाला अटक, दुसरा फरार, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी भागात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी, २७ मे रोजी दुपारी २ वाजता कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक तर दुसरा फरार झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर असे की, जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील भिलाटी भागात हातात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने २७ मे रोजी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत विशाल संजय पवार (वय २३, रा. भिलाटी, मेहरूण) याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून ३० हजार रूपये किंमतीचा गावठी पिस्तूल जप्त केला आहे. त्याच्या सोबत असलेला संशयित आरोपी विशाल उमरे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा घटनास्थळावरुन फरार झाला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक किशोर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here