अमळनेर पोलिसांची टवाळखोर रोड रोमिओंवर कारवाई

0
44

प्रताप महाविद्यालय, धनदाई कॉलेज परिसरात पोलिसांची धडक

साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

शहरात कॉलेज परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिला व मुलींची छेडखानी करण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी गांभीर्यपूर्वक विचार करत शहरातील प्रताप महाविद्यालय व धनदाई कॉलेज परिसरात कारवाई करण्याचे नियोजन केले. दोन्ही महाविद्यालय परिसरात दोन वेगवेगळे पथके तयार करून पथकांना कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यावरुन टवाळखोर रोड रोमिओंवर कारवाई करण्यात आली आहे.

दोन्ही पथकांनी दोन्ही महाविद्यालयीन परिसरात आठ रोडरोमिओंना हेरून त्यांच्याकडून महाविद्यालयीन ओळखपत्राची मागणी केली. परिसरात फिरण्याचा आणि थांबण्याचा उद्देश विचारला. परंतु त्यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने व उडवाउडविची उत्तर देत असल्याने परिसरात थांबण्याचे सबळ कारण नसल्याने आठ मुलांना रोमिओगिरी करताना तसेच सार्वजनिक शांततेच्या भंग करून आरडा ओरड करताना मिळून आल्याने त्यांच्यावर कायद्यान्वये कारवाई केली आहे. भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करणारे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी दिली.

यांनी केली कारवाई

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ.गणेश पाटील, मिलिंद सोनार, रवींद्र पाटील, पो.काॅ. निलेश मोरे, जितेंद्र निकुंभे, अमोल पाटील, विनोद संदानशिव, गणेश पाटील, विनोद पाटील, पो.ना.सिद्धांत सिसोदे, मिलिंद बोरसे, संजय बोरसे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here