तासखेड्यात अवैध दारू विक्री केंद्रांवर कारवाई

0
11

साईमत/ न्यूज नेटवर्क/ सावदा, ता.रावेर :

रावेर तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या तासखेडा येथे कोणताही कायद्याचा धाक न बाळगता जोमाने दारू विक्री केली जात होती. अशा अवैध दारू विक्रीला कंटाळून गावातील महिलांनी ग्रामपंचायत सदस्याला सोबत घेऊन दारूबंदीसाठी सावदा पोलीस ठाण्यात ४ जुलै रोजी आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी नूतन स.पो.नि. विशाल पाटील यांच्या समक्ष आक्रोश करत ‘आम्हाला न्याय द्या…आमच्या मुलाबाळांना सुखाचा घास खाऊ द्या… दारुमुळे आमचे कुटुंब उघडल्यावर पडले असून आमच्या संसाराची राखरांगोळी होण्यापासून वाचवा…’ असे रडत रडत गावात कायमची अवैध दारुबंदी करण्याची रास्त मागणी केली होती. यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर असे गृहीत धरण्यात आले होते की, सावदा पोलीस त्याअनुषंगाने जलदगतीने येथील अवैध दारू विक्री केंद्रांवर ठोस कारवाई करून त्रयस्थ महिलांना न्याय देतील. परंतू याठिकाणी दारु विक्री केंद्रांवर भुसावळ दारुबंदी विभागाने छापा टाकून कारवाई केल्याने सावदा पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे चर्चिले जात आहे.

दारुबंदीसाठी महिलांच्या आक्रोश मोर्चाची आणि वृत्तपत्रातील बातम्यांची तात्काळ दाखल घेवून दुसऱ्याच दिवशी पहाटेच भुसावळ उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच निरीक्षक सीमा तपासणी नाका पुर्ण खतीब यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने तात्काळ तासखेडा येथे जाऊन अवैध गावठी दारु विक्री केंद्रांवर छापे टाकून गुन्ह्याची नोंद केली आहे. कारवाईत त्यांनी ६५ लिटर गावठी पन्नीदारु हस्तगत करून आरोपींविरुद्ध गुन्हेही दाखल केले आहेत. तसेच अशा अवैध दारू विक्रेत्यांवर अशीच कारवाई यापुढे करण्याचे कार्य सुरू राहील, असे भुसावळ दारुबंदी विभागाचे पो.नि. सुजित कपाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दोनपेक्षा जास्त गुन्हे घडल्यास कठोर कारवाई

तासखेडा ग्रामपंचायत येथे बैठक घेऊन येथील महिला व ग्रामस्थांना पो.नि.सुजित कपाटे यांनी गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, यापुढे अशा आरोपींवर दोनपेक्षा जास्त गुन्हे घडल्यास त्यांच्याविरुद्ध नवीन कायद्याचे कलम ९३ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले.

या पथकाने केली कारवाई

कारवाई करणाऱ्या पथकात भुसावळ उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, निरीक्षक सीमा तपासणी नाका खतीब, दुय्यम निरीक्षक भडांगे, निरीक्षक दारूंडे, सहा. दुय्यम निरीक्षक बाविस्कर, जवान देशमुख व पाटील यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here