पाचोऱ्यात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

0
16

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

शहरातील भारत डेअरी बसस्टॉपजवळ आणि नागसेन नगर येथील दीपक बागुल, राजेश खैरनार या गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत तयार गावठी दारू विक्रेत्याकडून ६० लीटर गावठी पोटलीसह तयार ३ हजार ३९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी विभागाचे पोलीस कर्मचारी गिरीश पाटील, नंदू पवार यांनी केली. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातही गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणाऱ्या विरोधात कारवाईचे धाडसत्र राबविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here