पाचोऱ्यात श्रीराम मंदिरातील पाण्याची मोटर चोरणाऱ्या आरोपीला अटक

0
28

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील श्रीराम मंदिरामधील विहिरीवरील असलेली पाण्याची मोटर खराब झाली होती. त्यामुळे तिच्या दुरुस्तीसाठी तिला वर काढण्यात आले होते. मात्र, श्रीराम मंदिराचे पुजारी सूरदास महाराज यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना चोरांनी रात्री मोटर चोरून नेली असल्याचे सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार सूरदास महाराज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या आदेशाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यानंतर श्रीराम मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करुन आरोपीला दोन तासात अटक केली आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पाण्याची मोटर साधारण पाच हॉर्स पॉवरची आहे. तिची किंमत सात ते आठ हजार रुपये आहे. ती चोरीला गेली होती. पाचोरा पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल पाण्याची मोटरसह त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अशोक पवार रुजू झाल्यापासून अनेक गुन्हे उघडकीस येत आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे डीबी कर्मचारी राहुल शिंपी, योगेश सुरेश पाटील, योगेश अरुण पाटील, गजानन काळे यांनी श्रीराम मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करुन आरोपीला दोन तासात अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here