चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन रोकडसह मोबाईल मोबाईल जप्त

0
43

बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात घेतला शोध

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

येथील एम. जे. नगरातील फिर्यादी विनोद प्रकाश बारी यांनी त्यांच्या मालकीचे शिवाजी चौकातील जगेश्वर पापड केंद्र, पिठाची गिरणीतून त्यांचा सात हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन आणि तीन हजार ३२० रुपये रोख असा दहा हजार ३२० रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेलेबाबत फिर्याद दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मोबाईल फोन, रोख रुपये व अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांचे पथक स्थापन करुन त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले होते. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीताचा गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे चाळीसगाव शहरात बस स्थानकाच्या पाठीमागील परिसरात शोध घेतला. तो मिळुन आल्याने आरोपी आनंद राजेंद्र सरोदे (रा.गल्ली नं. ७, पारोळा रोड, धुळे, ता.जि.धुळे) यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि तीन हजार ३२० रुपये रोख असा दहा हजार ३२० रुपये रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. राहुल सोनवणे, पो.ना. भूषण पाटील, महेंद्र पाटील, पो.कॉ. विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन यांच्या पथकाने केली. पुढील तपास राहुल सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे करीत आहेत.

व्यवसायिकांनी सीसीटिव्ही कॅमेरे बसवुन घ्यावे

चाळीसगाव शहरातील व्यवसायिकांनी आपल्या दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत. तसेच कोणी संशयित इसम आपल्या दुकानात येत जात असेल तर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन दुरध्वनी क्र. 02589-222077 वर तात्काळ कळविण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here