साईमत लाईव्ह धरणगाव प्रतिनिधी
तालुक्यातील अनोरे येथून मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत जात असतांना जांभोरा गावाजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शाम भास्कर पाटील (वय ४०, रा. मंगरूळ ता. पारोळा) व जयवंत गोरख पाटील (वय २८, रा. मंगरूळ ता. पारोळा) असे प्लाटिना मोटार सायकल (क्र. MH १९ DW ५७८७) ने दि.१७ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मित्र किरण भास्कर रोकडे (रा. धानोरे ता. धरणगाव) यांच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने शाम पाटील याच्या ताब्यातील मोटर सायकलचा वेग नियंत्रित न झाला नाही. त्यामुळे मोटार सायकल स्लिप होत दोघं मोटार सायकलवरुन खाली पडले.
यात दुचाकीवर मागे बसलेला जयवंत पाटील हा पुलाच्या कठड्यावर जोरात पडल्याने त्याच्या डोक्यास, चेह-यास व पायाला जबर मार लागला. त्यास तात्काळ १०८ रुग्णवाहीकेने उपचारासाठी कुटीर रुग्णालय पारोळा येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून धुळे येथे रवाना केले. १०८ रुग्नवाहीके मधील डॉक्टरांनी वाटेत तपासून जयवंतला मृत घोषीत केले. या अपघात शाम पाटील देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, सुनील पांडुरंग पाटील (रा. ओम नगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक शाम पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.