साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रात रस्त्यावर अपघाताची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित मृत्युंजय दूत नागरिकांनी करावयाची मदत याबाबतीत प्रथमोपचार प्रशिक्षणाद्वारे धडे देण्यात आले. यावेळी जळगाव इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या उज्ज्वला शर्मा यांनी जखमी व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी कसे प्रयत्न करावे, याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी नाशिक विभागाचे डीवायएसपी प्रदीप मैराळे, धुळे विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, एपीआय राजेंद्र सोनवणे यांनी अपघात घडल्यानंतर पोलीस रुग्णवाहिका व दवाखान्यात दाखल करण्याबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन करून अपघातस्थळी मदत कार्य करण्यास तत्पर असणाऱ्या मृत्युंजय दूत यांना ओळखपत्र वाटप केले.