भुसावळात दहा दिवसात पिण्याचे मुबलक पाणी देणार

0
29

साईमत भुसावळ प्रतिनिधी

शहरात विविध समस्यांमुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे भुसावळ नगरपरिषदेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या अनुषंगान शिवसेनेच्या (उबाठा) वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला होता.दरम्यान, आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी न.पा.मुख्याधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक लावण्यात आली होती. यावेळी येत्या १० दिवसात सर्व समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, न.पा. मुख्याधिकारी महेश वाघमोडे, शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे , बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक पप्पू बारसे, स्वप्निल सावळे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, पिंटू भोई, अमजद शेख, नबी पटेल, मनोज पवार, महमूद शेख, राकेश खरारे, अरुण साळुंके आदि पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक धांडे यांनी सांगितले की, शहरात शुद्ध स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहे. १०-१५ दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे सामान्य गरीब नागरिकांना सतत पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. गरीब जनतेला एवढे दिवस पाणी साठवण्यासाठी कोणतीही सुविधा नसते. तसेच झोपडपट्टी परिसरात जनतेला राहण्यासाठी पुरेशी जागा नसते त्यातच १० दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गरीब जनतेने जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालेला आहे असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या पाणी समस्ये बाबत गांभीर्याने लक्ष घालून ८ दिवसात स्वच्छव नियमित पाणी पुरवठा कसा होईल असे नियोजन करण्या बाबत, तसेत शहरातील खड्डे, लाईट, साफसफाई होण्या बाबतीतच्या समस्या येत्या १० दिवसांमध्ये सोडवण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here