आरतीतील सामूहिक सहभाग, एकात्मतेचा निर्धार दिशा देणारा ठरला
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील कंजरवाड्यातील जाखनी नगरात कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे नवदुर्गा मित्र मंडळात महाकाली मातेची आरती आयोजित केली होती. हा कार्यक्रम फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. धार्मिक व सांघिक उपक्रमातून फाउंडेशनची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक उपस्थिती अधोरेखित झाली. भगवे सहकारी मोठ्या शिस्तीने व वेळेवर सहभागी झाले. हा सामूहिक सहभाग आणि एकात्मतेचा निर्धार फाउंडेशनच्या कामकाजाला दिशा देणारा ठरला असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय दहियेकर, उपाध्यक्ष प्रदीप नेतलेकर, कार्याध्यक्ष शशिकांत बागडे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, सदस्य विजय अभंगे, उमेश माछरेकर, वीर दहियेकर, गौतम बागडे, संदीप गारुंगे, पंकज गागडे, संतोष गारुंगे, गणेश बागडे, प्रितेश नेतलेकर, जयेश माछरेकर, कार्तिक बाटूंगे मंडळाचे अध्यक्ष शशिकांत गागडे, उपाध्यक्ष नितीन तमायचे, महेंद्र बागडे, कपिल बागडे, पंकज नेतलेकर, रमेश बागडे, राहुल तमायचे, सुदाम बागडे, राकेश गागडे, ओम बागडे, आकाश बागडे, प्रथम तमायचे, विशाल तमायचे, विशाल गारुंगे, आदित्य बागडे आदी समाजबांधव उपस्थित होते.