प्रभागातील १५ जोडप्यांच्या हातून आदिशक्तीची विधीवत पूजा
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर व अजिंक्य बाविस्कर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या आदिशक्तीच्या आरत्यांचा व माहितीचा संग्रह असणाऱ्या पुस्तिकेचे घटस्थापनेच्या दिवशी आनंदा माता मंदिर, सराफ बाजार येथे माजी खासदार उन्मेष पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील १५ जोडप्यांच्या हातून आदिशक्तीची विधीवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली.
याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शिवसेना नेते मोरसिंग राठोड, शिवसेना तालुकप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मा. नगरसेवक शाम देशमुख, मा. नगरसेवक रामचंद्र जाधव, तालुका संघटक सुनील गायकवाड, बेलगंगेचे संचालक बाळासाहेब पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, वि.का.सोसायटीचे चेअरमन प्रदीप देशमुख, मा. नगरसेवक संजय ठाकरे, मा.नगरसेवक शेखर देशमुख, मिलिंद शेलार,योगेश पाटील, सुवर्णकार समाजाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर बाविस्कर, सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष अशोक बाविस्कर, वाणी समाजाचे अध्यक्ष शरद मोराणकर,
महिला मंडळाच्या अध्यक्षा मालती विसपुते, लता सराफ, माजी नगरसेविका शीतल नेरकर, माजी नगरसेविका स्नेहा बाविस्कर, सविता बाविस्कर, आदी महिला मंडळाच्या सदस्या सुवर्णकार समाज अध्यक्ष शाम दंडगव्हाळ, सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष सुशील सोलंकी, मनोज सोलंकी, विश्व हिंदू परिषदेचे विजय बाविस्कर, अशोक सोलंकी, जवाहर बोरा, सचिन बोरा, प्रशांत बाविस्कर, चेतन जैन, प्रवीण वानखेडे, मुकेश दुसाने, संकेत सोनार, अमोल विसपुते, गोपाल मोरे, सुधीर मोरे, श्रीकांत विसपुते, अक्षय देशमुख, शुभम विसपुते, साहिल दाभाडे, गोविंद शुक्ल, गजेंद्र शुक्ल, मंदिराचे मुख्य पुजारी अरुण शुक्ल, मयूर खरोटे, मेघराज जाधव, अमित सुराणा, देविदास गोल्हार, कुणाल जगताप, निलेश खैरनार, नावीन्य नेरकर, सुजय भामरे, शंकर सोनार, राज बाविस्कर, राजेंद्र येवले, विनोद बोरा, राजेंद्र मुंदडा, गोपाल वर्मा, कैलास मोरे, नंदकिशोर अमृतकार, विराज पुरकर, युवा सेनेचे रॉकी धामणे, किरण घोरपडे, सर्जेराव पाटील, शंकर सोनार, ज्ञानेश्वर पाटील, उमेश अंधोळकर आदी उपस्थित होते.