‘बाबा, शिवसैनिकांना शिवबंधनाऐवजी जीपीएस ट्रॅकर बांधू ; मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले

0
29

साईमत लाईव्ह

मुंबई : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे ३९ आमदार फोडले. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.शिवसेनेकडून सध्या आपल्या शाखाप्रमुखांकडून पक्षाशी बांधील राहीन, अशी प्रतिज्ञापत्रं लिहून घेतली जात आहेत. यापार्श्वभूमीवर मनसेने (MNS) पुन्हा शिवसेनेला (Shivsena) डिवचले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला.

देशपांडे यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकानी दिलले प्रतिज्ञापत्र आहे दुसरीकडे टीव्ही चालू आहे. ज्यामध्ये एकनाथ शिंदे हे आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा दावा करताना दिसत आहेत आदित्य ठाकरे यांच्या हातात जीपीएस ट्रॅकर असून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत आहे की, बाबा, मला एक आयडीया सूचली आहे आपण शिवसैनिकांम शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राऐवजी जीपीएस ट्रॅकरच (GPS track) बाधुयात का? असे द्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. मनसेच्या या टीकेला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here