विवरे शिवारात मेन इलेक्ट्रीक लाईनच्या टाॅवरवर तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

0
37

निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

साईमत/रावेर/प्रतिनिधी :

तालुक्यातील विवरे येथील खिर्डी रस्त्यावरील विवरे शेत शिवारात एका शेतातील पाॅवरग्रिटच्या टाॅवरवर चढून एका २५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना विवरे गावाजवळ घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबड उडाली. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या पाॅवर ग्रिटच्या अतिउच्च विद्युत क्षमतेच्या टाॅवरवर सुमारे शंभर ते सव्वाशे फुटवर चढून ब्रिजेश कुमार बायगा (वय २५, रा. भरतपूर, छतीसगढ) याने कापडाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे याठिकाणी विवरेसह खिर्डी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी सकाळपासून एकच गर्दी केली. ब्रिजेशकुमार याची पँट व टोपी त्याठिकाणी आढळून आली. त्याच्या पॅटमध्ये पॅनकार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला. त्यावरून त्याची ओळख पटली. अंदाजे सुमारे शंभर ते दीडशे फुट उंच टाॅवरवर चढून आत्महत्या केल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा विषय घटनास्थळी चर्चेत होता.

ब्रिजेशला पाॅवर ग्रिटच्या अकोला पथकाच्या सहकार्याने खाली उतरविण्यात आले आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here