Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Jalgaon : शिक्षणासाठी वेटरचे काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
    क्राईम

    Jalgaon : शिक्षणासाठी वेटरचे काम करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

    saimatBy saimatFebruary 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Jalgaon: A young man who worked as a waiter for education committed suicide.
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आदर्श नगरमध्ये दुर्दैवी घटना; १९ वर्षीय तरुणाने गळफास घेतला

    साईमत/जळगाव /प्रतिनिधी :

    शिक्षणाची स्वप्ने डोळ्यांत साठवून, कठीण परिस्थितीतही जिद्दीने पुढे वाटचाल करणाऱ्या एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना जळगावात उघडकीस आली आहे. प्रवीण तुलसीदास राठोड (वय १९, रा. आदर्श नगर) असे मृत तरुणाचे नाव असून तो बारावीच्या परीक्षेला सामोरा जात असतानाच त्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धानवड येथील मूळ रहिवासी असलेला प्रवीण राठोड हा जळगावात हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदारी आणि शिक्षणाचा खर्च पेलण्यासाठी त्याने कामाचा मार्ग निवडला होता. प्रतिकूल परिस्थितीतही तो बारावीची परीक्षा देत होता. शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची परिस्थिती सुधारावी, अशी त्याची इच्छा असल्याचे सहकाऱ्यांनी सांगितले.

    प्रवीण हा हॉटेल मालकाच्या आदर्श नगर येथील घरात भाडेतत्त्वावर इतर सहकाऱ्यांसह राहत होता. घटना घडली त्या दिवशी त्याचे सहकारी बाहेर गेलेले असताना प्रवीणने खोलीत गळफास घेतल्याचे समोर आले. काही वेळाने सहकारी परत आल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रवीणला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला.

    अखेर गॅलरीतून आत प्रवेश करून पाहिले असता प्रवीण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

    या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहेत.

    दरम्यान, शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या तरुणाच्या दुर्दैवी अंताने परिसरात शोककळा पसरली असून, आर्थिक व मानसिक ताणतणावांमुळे तरुणांमध्ये वाढणाऱ्या नैराश्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Jalgaon: जळगावात ८० कोटींचा महामार्ग अंडरपास

    February 21, 2026

    Jalgaon: दोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा अवघ्या १२ तासांत जेरबंद

    February 21, 2026

    Muktainagar : उड्डाणपुलासाठी साठवलेला माल चोरीला चोरट्यांचा वाहनातून पलायनाचा संशय

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.