Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Online For Rs. 17 Lakhs : जळगावातील तरुणाची तब्बल १७ लाखांची ऑनलाईन फसवणूक
    क्राईम

    Online For Rs. 17 Lakhs : जळगावातील तरुणाची तब्बल १७ लाखांची ऑनलाईन फसवणूक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 4, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सायबर पोलिसात ४ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ‘ट्रेण्ड नाऊ’ नावाच्या ॲप्लिकेशनद्वारे जळगावातील एका तरुणाची तब्बल १६ लाख ९८ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही फसवणूक १२ नोव्हेंबर २०२४ ते ३ जुलै २०२५ या कालावधीत घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी ३ जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, राजमालती नगर येथील निखील कैलास गौड (वय २९) यांना नोव्हेंबर २०२४ मध्ये काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी निखीलला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी निखीलला ‘ट्रेण्ड नाऊ’ नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यास सांगितले. त्यातून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला ५ ते १० हजार रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सांगितले. काही काळानंतर निखीलला नफा झाल्याचे भासविण्यात आले. ज्यामुळे त्याला अधिक पैसे गुंतविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. प्रत्यक्षात, निखीलच्या खात्यावर १८ लाख ६० हजार रुपयांचा नफा दाखविण्यात आला. परंतु हा केवळ आभास होता. प्रत्यक्षात, निखीलची १६ लाख ९८ हजार सहा रुपयांची फसवणूक झाली होती.

    सायबर पोलिसात दिली फिर्याद

    आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निखील गौड यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी ४ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.