एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील अयोध्या नगरातील विषारी औषध घेतलेल्या ३२ वर्षीय तरूणाचा मंगळवारी, १३ मे रोजी दुपारी १ वाजता उपचारावेळी मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. योगेश लिलाधर वाघोदे (वय ३२) असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील अयोध्या नगरात योगेश वाघोदे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याला तातडीने जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना १३ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास पो.हे.कॉ.स्वप्निल पाटील करीत आहे.