Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»सोयगाव»पाय घसरून कुंडात पडल्याने तरुणाचा मृत्यू
    सोयगाव

    पाय घसरून कुंडात पडल्याने तरुणाचा मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोयगावच्या धारकुंड धारेश्वर येथील घटना

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी

    येथून जवळील धारेश्वर (धारकुंड) येथील धबधब्याखाली अंघोळ करत असताना पाय घसरून कुंडात पडल्याने एका तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि.२६) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. तरुणाचे नाव गजानन राघु माने (वय ३५, रा. केऱ्हाळा, ता. सिल्लोड) असे आहे. श्रावण सोमवारनिमित्त गजानन दर्शनासाठी आला होता. दर्शनाआधीच त्याचा कुंडात बुडून मृत्यू झाला आहे.

    वाडीसुतांडा गावापासून सहा कि.मी. अंतरावरील धारकुंड धारेश्वर महादेवाचे तीर्थक्षेत्र आहे. येथे तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा पर्यटकांना आकर्षित करीत असतो. अत्यंत घनदाट जंगलात हे धार्मिक स्थळ आहे. पायवाटद्वारे येथे भक्तगण मोठ्या प्रमाणावर येत असतात. श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. श्रावण सोमवार असल्याने सिल्लोड तालुक्यातील केहऱ्हाळा येथील गजानन माने व चार ते पाच मित्रांसोबत धारकुंड धारेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आले होते. येथे आल्यावर तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबाखाली अंघोळ करण्यासाठी गजानन व मित्र गेल्यावर गजाननचा पाय घसरला. तेथील मोठ्या कुंडात जाऊन पडला. येथील कुंडास मोठमोठ्या कपारी असल्याने गजानन पाण्यात दिसला नाही.

    पट्टेदार पोहणाऱ्यांनी मृतदेह काढला बाहेर

    घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपनिरीक्षक रज्जाक शेख जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, विकास दुबेले पोहोचले. तेथे काही पट्टेदार पोहणाऱ्यांनी सायंकाळी पाच वाजता गजानन मानेचा मृतदेह बाहेर काढला. मृत गजाननच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगा, एक मलगी, तीन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Soygaon : १३ वर्षांनंतर घोसला आरोग्य उपकेंद्र पुन्हा कार्यान्वित

    December 15, 2025

    flood ; पुरात रस्ताच गेला वाहून

    October 3, 2025

    Water bodies dry : वेताळवाडी, धिंगापूर,घोसला शिवारातील पाणवठे कोरडेठाक; वन्यप्राणी मृत्यूच्या दाढेत

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.