साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जीवेठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बोदवड शहरात राहणारा इरफान इस्माईल सैय्यद (वय २५) याने ओळखीचा फायदा घेवून तिला वेळोवेळी सोबत नेवून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितली तर जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी इरफान सैय्यद याच्यावर गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.