गोवंशाची वाहतूक करणारे वाहन पकडले

0
10

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

गिरड रस्त्यावरून छोटा हत्ती वाहनातून निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असतांना गावातील ग्रामस्थांच्या मदतीने वाहन पकडण्यात आले. या कारवाईत पाच गुरांची सुटका केली आहे. वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, भडगाव तालुक्यातील गिरड गावातील सरकारी दवाखान्याजवळ छोटा हत्ती वाहन (क्र.एमएच ४८ टी ७४०४) यात पाच गुरांना निर्दयतने कोंबून त्यांची कत्तलीसाठी घेवून जात असतांना काही ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी वाहन थांबवून भडगाव पोलीसांना कळविले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहन ताब्यात घेत पाच गुरांची सुटका केली. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समीर खान फिरोज खान, गाडी मालक अयुब शेख युसूब शेख (दोन्ही रा. पाचोरा), गुरांचे मालक (नाव गाव माहित नाही) आणि प्रभाकर चुडामन पाटील (रा. गिरड, ता. भडगाव) अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. हिरालाल पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here