Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भाजीपाला विक्रेत्यावर संकट कोसळले अन्‌‍ जीवावर बेतले
    जळगाव

    भाजीपाला विक्रेत्यावर संकट कोसळले अन्‌‍ जीवावर बेतले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव/पारोळा : प्रतिनिधी

    जिल्ह्यातील पारोळा शहरात भाजीपाला विक्रेता त्याच्याच लावलेल्या हात गाडीवर पैशांचा हिशेब करत होता. त्याचवेळी अचानक त्या ठिकाणच्या खांबावरील विजेची तार कोसळली आणि त्यात भाजीपाला विक्रेत्याचा मृत्यू झाला. पारोळा शहरातील बूधनाथ मठा जवळील महाराष्ट्र रेस्टॉरंटजवळ शनिवारी, सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास घडली. परमेश्वर संतोष महाजन (वय ४२, रा. पेंढारपूर, पारोळा) असे मयत भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. दरम्यान, भाजीपाला विक्रेत्यावर संकट कोसळून त्यांच्या जीवावर बेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. भाजीपाला विक्रेत्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    सविस्तर असे की, परमेश्वर महाजन हे शनिवारी नेहमीप्रमाणे पारोळा शहरातील बाजारपेठेतील हाकेच्या अंतरावरील हातगाडीवर भाजीपाल्याचे दुकान लावतात. शनिवारी रिमझिम पाऊस सुरु होता. ते सायंकाळी भाजीपाला विकून पैशांचा हिशोब लावत असतानाच अचानक याठिकाणी असलेल्या खांबावरील विजेची तार तुटून परमेश्वर महाजन यांच्या अंगावर कोसळली.

    याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धावत काठीच्या सहाय्याने परमेश्वर यांच्या अंगावर पडलेली विद्युत तार बाजुला केली. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविले. यावेळी याठिकाणच्या नागरिकांनी घटनेची माहिती महावितरण विभागाच्या कार्यालयाला दिली. त्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. परमेश्वर यांना खासगी रुग्णालयातून पारोळा शहरातील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परमेश्वर महाजन यांना मृत घोषित केले.

    मोठा अनर्थ टळला

    पारोळा शहरातील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी सायंकाळी नागरिकांची गर्दी होत असते. मात्र, रिमझिम सुरू असलेल्या पावसामुळे गर्दी कमी होती. त्याठिकाणी गर्दी असती तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती, असा जनतेतून चर्चेचा सूर उमटला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.