संगमनेरमधील जगावेगळा लव्ह ट्रायँगल!

0
10

अहमदनगर :

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या कोल्हेवाडी गावातील एका तरुणाचा ठरलेला विवाह गावातीलच एका व्यक्तीने मोडून स्वतःच लग्न त्याच मुलीबरोबर ठरवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात त्या तरुणाला बोलावून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर तरुणाने टोकाचा निर्णय घेत थेट गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

कोल्हेवाडीतील नितीन सिताराम खुळे (वय ३२) या तरुणाने सोमवारी वडगावपान शिवारातील बाभळीच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी या तरुणाने त्याच झाडाखाली बसून आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ शूट केला होता. व्हिडीओमध्ये तरुणाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. त्यानंतर नितीनने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

याशिवाय त्याच्याजवळ एक डायरी देखील आढळून आली आहे. या डायरीमध्ये नितीनला इतक्या टोकाचा निर्णय घेण्यासाठी भाग पाडणाऱ्या काही लोकांची नावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी यासाठी गावकऱ्यांनी तब्बल ३० तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. शेवटी रात्री उशिराने गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास संगमनेर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here