साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शहरातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालय याठिकाणी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. रक्षाबंधन उत्सवात प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण, मयूर चौधरी, राहुल पोहेकर, अंकुश जोशी, विशाल सोनवणे, रवि पाटील, केतन जोशी, किरण जाधव, पवन सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्मचारी वृंद हा एक समाजाचा विश्वासाचा भाग आहे. विविध ठिकाणी काही समाज कंटक जाणीवपूर्वक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. आपली सरकारी नोकरी म्हणून आपले बंधू त्रास सहन करत असतात. यानिमित्त वंदन मातृभूमी प्रतिष्ठान आपल्या सोबत आहे. अत्याचार अन्याय झाला तर कधी पण आवाज द्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण यांनी दिले.