प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबविला विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दररोज यावे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या वतीने, ज्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के हजेरी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने “शाळेमध्ये शंभर टक्के हजेरी आहे” अशा पद्धतीचा बॅच लावून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक जनजागृती त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी आणि आपण शाळेत दररोज आले पाहिजे. अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबतीत कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण होणार नाही. एक छोटासा बदल शाळेच्यावतीने करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचा सन्मान करताना प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक रजीश बालन उपमुख्याध्यापक निखिला उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.