साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
मुंबई पोलीस शुभम अनिल आगोणे ह्याच्या मृत्यूनंतर त्याच्या केवळ आठवणी आता स्मरणात राहिल्या आहेत. अशातच दैनिक ‘साईमत’ने स्मरणातील त्याच्या एका आठवणीला उजाळा दिला आहे. ही आठवण ताजी असतांनाच त्याची अचानक झालेली ‘एक्झिट’ सर्वांना चटका लावणारी ठरली आहे.
गेल्या नोव्हेंबर २०२३ मध्ये चाळीसगाव येथील दैनिक ‘साईमत’ विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. ह्या कार्यक्रमात शुभम आगोणे हा त्यांच्या मित्रांसोबत दैनिक ‘साईमत’चे मुख्य संपादक प्रमोद बऱ्हाटे, कार्यकारी संपादक त्र्यंबक कापडे, विभागीय कार्यालय प्रमुख मुराद पटेल आणि शहर प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासह सर्व टीमला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. प्रेमळ आणि शांत स्वभावाचा शुभम चाळीसगावकरांचा लाडका होता. त्याला मोठ्या प्रमाणावर मित्रांचा गोतावळा लाभला होता. चाळीसगाव येथे क्रिकेटच्या किरकोळ कारणावरून झालेला हा वाद इतका चिघळला की, त्यात शुभमला आपला जीव गमवावा लागला. शुभमला एक वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. अत्यंत प्रेमळ मित्र, ‘शुभम’… हा सर्वांच्या कायम स्मरणात राहील, हेही तेवढेच खरे.