मेहूणबारे येथे  बंगल्यात जुगार अड्यावर अन सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकचा छापा 

0
33
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी
तालुक्यातील  मेहूणबारे येथे भऊर रस्त्यालगत एका बंद बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सुमारे 26 जुगाऱ्यांना पकडले. या कारवाईत पोलीसांनी 61 हजार रूपये रोख व 2 लाख 8हजार रूपये किंमतीच्या 8 दुचाकी असा 2 लाख 69 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला असून मेहूणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांना माहिती मिळाली की, मेहुणबारे गावी भऊर गावाकडे जाणाऱ्या रोडलगत गढरी मळा येथे बंद घरात काही इसम हे स्वतःच्या फायद्यासाठी 52 पत्त्याचे कॅटवर झन्ना मन्ना नावाचे मांगपत्ता नावाचे जुगाराचा खेळ खेळीत व खेळवीत आहेत.त्यानुसार त्यांच्यासह पोकॉ.विश्वानाथ देवरे, अमृत पाटील, पोना.महेश बागुल, राजेंद्र निकम, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोना.कुशल शिंपी, प्रकाश कोळी यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी अचानक छापा टाकला असता तेथे 26 इसम जुगार खेळतांना मिळुन आले.त्यांचे ताब्यातून  रोख 61 हजार रूपये व 2 लाख 8 हजार रूपये किंमतीच्या दुचाकी,पत्ता जुगाराचे साहीत्य असा 2 लाख 69 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोकॉ. विश्वानाथ देवरे यांनी फिर्याद दिल्यावरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला मुंबई जुगार अॅक्ट कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापुढे देखील अशा प्रकारची अवैध धंद्याविरूध्द धडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here