अमळनेरला भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांची काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

0
14

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

“पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर न्या” अशा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर अमळनेरात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. त्यामुळे अमळनेर शहरात तिरंगा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत बावनकुळे यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांना निवेदन देण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे वक्तव्य पत्रकारांवरील शाब्दिक हल्ला असल्याने पत्रकारांवरील हल्ले या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, त्यामुळे असे वक्तव्य करण्याचे धाडस कोणीही करणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष अजय भामरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय सरचिटणीस रवींद्र मोरे, कार्याध्यक्ष समाधान मैराळे, हिरालाल पाटील, धनंजय सोनार, सुरेश कांबळे, जितेंद्र पाटील, उमेश धनराळे, विनोद कदम, राहुल पाटील, ईश्वर महाजन, गुरुनामल बाठेजा, मिलिंद पाटील, हितेंद्र बडगुजर, प्रवीण बैसाणे, आत्माराम अहिरे, दिनेश पालवे आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here