भुसावळात खड्डेमय रस्त्याची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा

0
16

खड्डेमय रस्त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचेही आंदोलन

साईमत/भुसावळ/प्रतिनिधी :

ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटनांच्या माध्यमातून भुसावळ शहरातील खड्डेमय रस्त्याची अंत्ययात्रा गुरुवारी बसस्थानक ते नाहाटा कॉलेज चौफुलीपर्यंत काढण्यात आली. सर्वप्रथम गणरायाचे पूजन करून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. संविधान आर्मीचे कामगार नेते जगन सोनवणे, पुष्पा सोनवणे यांच्या माध्यमातून खड्डेमय रस्त्याच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

खड्डयाच्या रस्त्याची अंत्ययात्रा डॉ.बाबासाहेब पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, अमर स्टोअर मॉर्डन रोड, अष्टभुजा देवी मंदिर मार्गे, शहीद राकेश शिंदेच्या स्मारकास वंदन करून नाहाटा कॉलेज चौफुली लगत खड्डेमय रस्त्याच्या विरोधातील अंत्ययात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी भुसावळ शहरात पडलेले खड्डे संबंधित अनोख्या पध्दतीचे जन आंदोलन केल्याने भुसावळ शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले होते.

अंत्ययात्रेचे असे होते खांदेकरी

अंत्ययात्रेचे खांदेकरी म्हणून कामगार नेते जगन सोनवणे, आरिफ शेख, हरिष सुरवाडे, नारायण सपकाळे यांनी भूमिका निभावली. यावेळी मोर्चा व आंदोलनांचे नेतृत्व कामगार नेते ऑल इंडिया संविधान आर्मीचे अध्यक्ष जगन सोनवणे यांनी आमदार विरोधात चांगलीच आगपाखड व्यक्त केली.

यांनी घेतला आंदोलनात सहभाग 

याप्रसंगी पुष्पा सोनवणे, प्रदेश नेते राकेश बग्गन, जिल्हा प्रमुख आरिफ शेख, प्रदेश नेते हरिष सुरवाडे, भूसावळ तालुकाध्यक्ष चेतन सुरवाडे, वरणगावचे शहराध्यक्ष सगिर शहा, दीपक सोनको, नारायण सपकाळे (जिल्हा नेते), सम्राट बनसोडे (तालुका युवाध्यक्ष), सचिन बाऱ्हे, आदेश अजिज बाबा, अल्हाबका बागवान, अलिम बागवान, इमरान बागवान, साहिल बागवान, चंद्रकात कोळी, विजय बाटे, कैलास भोळे, गोपी साळी आंदोलनात सहभाग घेतला होता.

पदाधिकाऱ्यांचे खड्डयात बसुन आंदोलन

शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहे. अशा खड्डेमय रस्त्यांचा वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीकडे आ. संजय सावकारे यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खड्डयात बसुन आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here