Z.P. CEO Meenal Karnwal : सशक्त स्त्री हीच सशक्त परिवाराची पायाभरणी : जि.प.सीईओ मीनल करनवाल

0
22

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीतील विशेष आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

साईमत/जामनेर/प्रतिनिधी : 

मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. प्रत्येक मुलगी व महिलेने या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. पाळी ही लाज नसून अभिमान आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. कारण, सशक्त स्त्री हीच सशक्त परिवाराची पायाभरणी असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान राबविण्यात येत आहे. अशा अभियानाचा मुख्य उद्देश महिलांचे सशक्तीकरण करणे आणि त्यांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा आहे. उपक्रमाअंतर्गत जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. शिबिरात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी आणि वैयक्तिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलींना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. समाजातील संवेदनशील विषयावर जनजागृती करण्याचा हा अभिनव प्रयत्न ठरला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर, ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, यू.यू. पाटील, सागरमाल जैन, दीपक गरुड, उत्तम थोरात, प्रकाश झंवर, सुवामन फासे, युवा नेते स्नेहदीप गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता अन्‌ आवश्यक काळजीवर मार्गदर्शन

कार्यक्रमात महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनीही उपस्थित किशोरवयीन मुलींना मासिक पाळी, वैयक्तिक स्वच्छता आणि आवश्यक काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, सूत्रसंचलन पी.जे. पाटील तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here