‘त्या’ चिमुकलीच्या हत्येच्या निषेधार्थ भडगावात पाळला कडकडीत बंद

0
14

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या भयंकर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शनिवारी, ५ ऑगस्ट रोजी भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील नऊ वर्षाच्या बालीकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडल्याने परिसर हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. असे असले तरी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवून त्याला कठोर शिक्षा व्हावी. तसेच या प्रकरणात ॲड.उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी, अशा मागण्या करण्यात येत आहेत. या मागण्यांसाठी शुक्रवारी भडगावात भव्य मूक मोर्चासह ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यात सकल मराठा समाजासह अन्य समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनाच्या दरम्यान आ. किशोर पाटील यांनी पीडित कुटुंबियांना कठोर कारवाईबाबत आश्वस्त केले. तसेच विविध मान्यवरांनी कठोर कारवाईची मागणी केली.

नगरदेवळा, कजगाव येथेही बंदला प्रतिसाद
या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी भडगाव येथे स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती. नागरिकांनी या बंदला पाठिंबा देऊन या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे. याच प्रकारे भडगाव तालुक्यातील नगरदेवळा आणि कजगाव येथेही बंद पाळण्यात आला.

व्यापारी असोसिएशनतर्फेही बंदला प्रतिसाद
गोंडगाव येथील चिमकलीच्या हत्येच्या निषेधासाठी तालुका आणि शहर व्यापारी असोसिएशनने स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. त्या अनुषंगाने भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावी आठ वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करून कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली दाबून निर्दयीपणे हत्या करणाऱ्या नराधमास कठोरात कठोर कारवाई करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून खटल्यासाठी ॲड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शनिवारी बंद पाळण्यात आला. भडगाव शहर तसेच तालुक्यातून सर्व व्यापारी, मेडीकल असोसिएशन, किराणा असोसिएश, हातमजूर, हॉटेल असोसिएशन, सलून असोसिएशन, पान टपरी व्यावसायिक, सोनार असोसिएशन, आटोमोबाईल असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर असोशियन, कापड असोशियन, फोटोग्राफर असोशियन व सर्व ग्राहक सेवा संघ अश्ाा सर्व व्यापारी तसेच दुकानदार युनियन यांनी स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवसाय तसेच दुकाने बंद ठेवून अशा निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here