‘साक्षर नंदुरबार’साठी विशेष योजना हवी

0
8

साईमत, नंदुरबार: प्रतिनिधी
राज्याच्या उत्तर टोकाला असलेल्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचा क्रमांक निरक्षरतेच्या बाबतीत राज्यात पहिला आहे. मात्र ही ओळख पुसून नंदुरबारला नवी ओळख मिळवून देण्यासाठी आता आमदार सत्यजित तांबे यांनी बाह्या सरसावल्या आहेत. नंदुरबारमध्ये निरक्षर लोकांचे प्रमाण एवढे जास्त का आहे? याचा शास्त्रोक्त अभ्यास करून शासनाने त्रुटी दूर करणारी एखादी शिक्षण योजना जाहीर करावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविले आहे.
लवकरच नंदुरबार हे शिक्षण क्षेत्रासाठी नंदनवन करू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी मात्र नंदुरबारमधील निरक्षरतेबाबत नाराजी व्यक्त केली असून, ती दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष शिक्षण योजना राबविण्याची मागणी केली आहे.नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक सशक्त करायची गरज आहे. त्याशिवाय इथे शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणारे कार्यक्रमही हाती घ्याव्ो लागतील, असे आमदार तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.

नंदुरबारच नाही, तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात निरक्षर जनतेचे प्रमाण एवढे जास्त असणे चांगले नाही. नंदुरबार माझ्या जवळचा जिल्हा आहे, त्यामुळे माझ्या जिल्ह्यात निरक्षरांची संख्या एवढी मोठी असेल, तर खूप काम करायची गरज आहे.त्याची तयारीदेखील आहे. म्हणूनच सर्वांत पहिली पायरी म्हणून आम्ही शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्यातील शिक्षणव्यवस्थेचा विकास करण्यासाठी विशेष योजना आखावी, अशी विनंती केली आहे, असही आमदार तांबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here