साईमत, जळगाव : प्रतिनिधी
येथील अहिर सुवर्णकार महिला मंडळ आणि महाराष्ट्र सुवर्णकार सेना यांच्यावतीने म्हाडा कॉलनीजवळील अयोध्यानगरातील मातोश्री इन ॲड बँक्वेट हॉल याठिकाणी रविवारी लघु रुद्राभिषेक सोहळा महामंडलेश्वर संत ब्रजभूषण (बापू) (श्रीधाम) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला. सोहळ्यात ५१ यजमानांनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजूमामा भोळे, नगरसेविका तथा अहिर सुवर्णकार महिला मंडळ अध्यक्षा रंजना वानखेडे, प्रभाग समिती सदस्य तथा महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रयत्नाला यश मिळून लघु रुद्राभिषेक सोहळा प्रसन्न वातावरणात पार पडला. सोनार समाज बांधवांच्या समृध्दी आणि आनंदासाठी अत्यल्प दरात सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी समाज बांधव, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अहिर सुवर्णकार महिला मंडळ, महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
