झोपलेल्या क्लिनरचा ट्रकखाली चिरडून मृत्त्यू

0
36

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसीतील एका कंपनी समोर लावलेला ट्रक चालकाने सुरू करून बाहेर काढत असतांना ट्रक खाली झोपलेल्या क्लिनरचा चिरडून मृत्त्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. क्लिनर दीपक विनोद मेढे (३८, रा. फैजपूर, ता. यावल) असे मयत क्लिनरचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसीमधील एका कंपनीसमोर ट्रक उभा होता. त्याच ट्रकच्या खाली त्याच ट्रकचे क्लिनर दीपक मेढे झोपलेले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. व त्याने ट्रक सुरू करून जागेवरून बाहेर काढला. चाकाखाली कोणीतरी आल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यावेळी त्याने येऊन पाहिले असता त्याच्या ट्रकवरील क्लिनरच चिरडल्या गेल्याचे दिसले. ही घटना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. यात क्लिनच्या चेहऱ्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून हात-पायदेखील तुटले. ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. काही वेळातच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here