चिमुकलीच्या खूनाच्या निषेधार्थ निघाला मूकमोर्चा

0
19

साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर

भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील चिमुकलीवर अमानुष कृत्य करून निर्घृण खून केल्याच्या निषेधार्थ कासोदा येथील ग्रामस्थ आणि सर्व पक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मूक मोर्चाला व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मूक मोर्चाला कासोदा ग्रामपंचायतीपासून सुरुवात करण्यात आली.

मूक मोर्चात साधना माध्यमिक विद्यालय, कन्या माध्यमिक विद्यालय, भारती विद्यामंदिर, सार्वजनिक माध्यम उर्दू हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होते. मूक मोर्चाचा समारोप सिताराम भाई बिर्ला चौकात करण्यात आला. यावेळी कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन देऊन ग्रामस्थांनी आरोपीस फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यांचा होता सहभाग

मूक मोर्चात नाना महाजन, ज्ञानेश्‍वर आमले, महानंदा पाटील, सरपंच महेश पांडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, महिला अधिकारी तसेच शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here