स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडताना स्वतःचा कल आणि छंद तपासून पाहावा. निकोप सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. आयुष्यात उद्दिष्टे आणि तत्त्वे निश्चित करूनच ध्येय गाठावे. त्यामुळे त्यांना त्यांची स्वप्ने साकारता येतील, असे प्रतिपादन विज्ञान मंडळाचे मूळजी जेठा महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.प्रतिभा निकम यांनी केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी ‘विज्ञान : एक प्रगतशील करिअरचे द्वार’ विषयावर मार्गदर्शन करतांना बारावीनंतर विज्ञानाच्या उपलब्ध विविध करिअर वाटांविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य आर. बी.ठाकरे होते. यावेळी पर्यवेक्षिका प्रा. स्वाती बऱ्हाटे उपस्थित होत्या.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.प्रतिभा निकम यांच्या हस्ते नुकतेच विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते डॉ. प्रतिभा निकम यांचे स्वामी विवेकानंदांची आकर्षक मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रा. आर.बी.ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी प्रा.दिनेश महाजन, प्रा.विनोद पावरा, प्रा.स्वप्ना पाटील, प्रा.छाया पाटील, प्रा.वर्षा पाटील, प्रा.निलिमा पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी अजय काळे, विजय जावळे, चेतन वाणी आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा.विनोद वेदकर, सूत्रसंचालन प्रा.धनश्री पाटील तर आभार प्रा.वीणा भोळे यांनी मानले.