साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर
अयोध्या येथे होणाऱ्या प्रभु श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साकेगावातील प्रत्येक गल्लीबोळात भगवे वातावरण पसरल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे. प्रत्येक गल्लीत भगवे ध्वज व भगव्या पताका लावून प्रत्येक गल्ली सजविण्यात येत आहे. यासाठी गावातील तरुण अथक परिश्रम घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर गावात विविध जो तो आपापल्या परीने आपापल्या परिसरात स्वतःहून काम करत आहे.
येत्या २२ तारखेला प्रभू श्रीराम यांची प्रथमच पाचशे वर्षानंतर मंदिरात स्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंदिरावर दिवे लावणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच गावातील मंदिरेही आतापासून स्वच्छ करण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे गावात २२ तारखेला दिवाळीपेक्षाही मोठा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.