साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार मंगळवारी, ५ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आ.रोहित पवार आणि युवा नेतृत्व रोहित पाटील रविवारी, ३ सप्टेंबर रोजी अमळनेर दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सकाळी १० वाजता कार्यक्रम होणार आहे. शेतकरी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रा.काँ.चे अध्यक्ष शरद पवार हे ५ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. कार्यक्रमाला पाच हजार कार्यकर्ते अमळनेर तालुक्यातून जातील, अशी माहिती रा.काँ.चे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दौरा यशस्वी करण्यासाठी आणि पूर्व तयारीसाठी आ.रोहित पवार आणि रोहित पाटील छत्रपती शिवाजी नाट्यगृहात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. विविध ठिकाणी शेतीच्या बांधावर आणि इतर ठिकाणी ते भेट देणार आहेत. दौरा यशस्वी करण्यासाठी ते आवाहन करणार आहेत. दिवंगत माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या द्वार दर्शनालाही ते जाणार आहेत.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रंथालय सेलचे अध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश समन्वयक रीटा बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष श्याम पाटील, हर्षा चित्ते, अरुण शिंदे, डॉ. किरण पाटील, मनोहर पाटील, सचिन वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.