कुस्ती स्पर्धेत वाशिमच्या ‘विजय’ ने खेचली विजयश्री
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
पहुरच्या मातीत शनिवारी, ५ ऑक्टोंबर रोजी कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. त्यात वाशिमच्या विजय शिंदे या मल्लाने विजयश्री खेचून आणत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. कुस्त्यांच्या दंगलीतून हिंदु-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.
ख्वाजा नगरात मरहुम हाजी जमील खान आखाडा व बजरंग दल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कुस्ती स्पर्धेत वाशिम येथील विजय शिंदे या पैलवानाने ११ हजार १११ रुपयांची अंतीम कुस्ती जिंकली. त्याने जालना येथील जगदीश राजपूत याला काही क्षणातच धूळ चारली. पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कुस्त्यांच्या दंगलीचा आनंद घेतला. उद्घाटन चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जितेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजधर पांढरे, श्याम सावळे, साहेबराव देशमुख, संजय देशमुख, किरण पाटील, ईश्वर देशमुख, शेख चांद, मोईन शेख, सलीम मौलाना, राजू जंटलमन, राहुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कुस्त्यांच्या दंगलीत दीडशे जोड्या लावल्या
कुस्त्यांच्या दंगलीत दीडशे जोड्या लावण्यात आल्या. पंच म्हणून मधुकर पैलवान, भास्कर पाटील, शैलेश पाटील, समाधान गोंधनखेडे, इका पहेलवान,गयास पैलवान, बंडू पाटील,समाधान पाटील, सलीम शेख आदींनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी बजरंग दल आखाडा व मरहूम हाजी जमील खान आखाडा शरीफ शेख, गफार शेख, इरफान शेख, रियाज शेख, आरिफ शेख आदींनी सहकार्य केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.