गर्भलिंगनिदान करणारे केंद्र, डॉक्टरसह व्यक्तीविषयी माहिती देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस

0
25

जामनेरातील कार्यशाळेत ॲड.शुभांगी चौधरी यांची माहिती

साईमत/जामनेर/प्रतिनिधी

गर्भलिंगनिदान करणाऱ्या केंद्र, डॉक्टर किंवा व्यक्तीविषयी माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवल्या जाते. यासाठी आपण १८००२३३४४७५ किंवा www.amchimulgi.gov.in वर तक्रार करू शकतात, अशी माहिती ॲड.शुभांगी चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पंचायत समितीच्या सभागृहात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यासाठी स्त्री भ्रूणहत्येविषयी कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे होते.

कार्यशाळेला पी.सी.पी.एन.डी. टी.च्या सदस्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.नम्रता अच्छा, कायदेशीर सल्लागार ॲड.शुभांगी चौधरी ह्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, आशा कुयटे उपस्थित होत्या.

स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी घेतली शपथ

कार्यशाळेत डॉ.अच्छा यांनी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांचे समुपदेशन करून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याविषयी विविध चित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याबाबत शपथ घेण्यात आली. सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी तर गटप्रवर्तक नीलिमा गवळी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here