सर्पमित्रासह वन्यजीव तज्ज्ञांची मदत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सुप्रीम कॉलनीतील शिवाजी शितोळे यांच्या घरात दुर्मिळ आणि निमविषारी वर्गात येणारा भारतीय अंडीखाऊ साप आढळला होता. त्यानंतर घरच्या लोकांनी तातडीने सर्पमित्र अशोक खामकर यांना फोन करून मदतीची मागणी केली. त्यानंतर त्यांनी वेळ न गमावता घटनास्थळी जाऊन सापाला सुरक्षितपणे पकडून घरातील लोकांना भयमुक्त केले.
वन अधिकारी अजय रायसिंगे, वनपाल उमेश कोळी, सर्पमित्र प्रदीप शेळके, राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे सांगण्यात आले. सर्पमित्रांच्या मते, हा साप निमविषारी असून मानवासाठी हानिकारक नाही. तरीही दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांनी साप दिसल्यास तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.