बोदवडातील आत्मनिर्भर फाउंडेशनला मनोरुग्णाला केले दाखल

0
69

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

वडनेर भोलजी येथे पंधरा ते वीस दिवसांपासून भरकटत असलेला एक मनोरुग्ण व्यक्ती बस स्थानकात आजारी आढळून आला होता. येथून जवळील वडनेर भोलजी येथील पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल संजय निंबोळकर, ना.पो.कॉ. विक्रम राजपूत, ए.पी.आय नागेश जायले यांनी त्याला २१ ऑक्टोबर रोजी रात्री ८-३० वाजता पोलीस चौकीचे बिट जमादार संजय निंबोळकर तसेच चौकीचे विक्रम राजपूत यांनी गावातील नागरिकांची मदत घेऊन त्यास बोदवडमधील आत्मनिर्भर फाउंडेशन येथे उपचार व योग्य देखभाल करण्यासाठी दाखल केले आहे.

त्या मनोरुग्णाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, डी.वाय.एस.पी.देवराम गवळी, नांदुरा पोलीस स्टेशनचे पी.आय. अनिल बेहेराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर फाउंडेशनला दाखल केले आहे. यावेळी गावातील पोलीस चौकीचे पो.कॉ. वेरुळकर, भारसाकडे, ग्रामपंचायतचे सरपंच पती रवींद्र सातव, गावातील प्रतिष्ठित नितीन देशमुख, समाजवादी पार्टीच्या जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे, शेर मोहम्मद, बाबा मिर्झा, पत्रकार हरी जुमडे आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here