बहारदार शैलीत गायलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे श्रोते मंत्रमुग्ध
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :
येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी, १४ ऑगस्ट रोजी सुवर्णाताई स्मृती उद्यान येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत देशभक्तीभर गीतांचा कार्यक्रम सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी न.पा.चे उद्यान पर्यवेक्षक तथा वरिष्ठ लिपिक दीपक देशमुख होते. याप्रसंगी चाळीसगाव शहरातील नामवंत गायक रवी निकम, संगीत शिक्षक तुषार मुजुमदार, टीव्ही कलाकार गौरव काळगे, सुनील राजपूत, अशोक चौधरी, कु.रक्षंदा मोरे, कुसावनी मुजुमदार, कु.विधी निकम यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
याप्रसंगी विद्युत अभियंता कुणाल महाले, स्वच्छता निरीक्षक सचिन निकुंभ, चाळीसगाव जॉगिंग ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संखेने उपस्थिती दर्शविली. शहरातील संगीत रत्नांनी बहारदार शैलीत गायलेल्या देशभक्तीपर गीतांमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सुत्रसंचालन मुकेश पवार यांनी केले.