साईमत, जामनेर : प्रतिनिधी
भविष्यात जामनेर तालुक्यात खेळाडूंसाठी नवीन क्रीडा संकुल तयार होणार आहे. तालुक्यातील १० क्रीडाप्रकार एकाच ठिकाणी होतील. तसेच शारीरिक सुदृढता व मानसिक स्वास्थाबद्दल महत्त्व नवनियुक्त जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळाडूंना पटवून दिले. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नगरपंचायत समिती, जामनेर तालुका ॲथलेटिक्स असो. आणि इंदिराबाई ललवाणी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वयोगट १४, १७ व १९ वर्षाआतील मुले, मुली तालुकास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा नुकत्याच इंदिराबाई ललवाणी विद्यालयाच्या पटांगणावर उत्साहात घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जामनेर तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार अवार्डी किशोर चौधरी, शुटिंगबॉल असोसिएशनचे के.आर. ठाकरे, इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, रोटवद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश पाटील, तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, जामनेर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव जी.सी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत तालुक्यातून ४६१ मुले २६८ मुलींनी सहभाग नोंदविला होता.
पंचामध्ये यांचा होता समावेश
स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून जामनेर तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव जी.सी.पाटील, विकास पाटील, डॉ.आसिफ खान, ए.व्ही.जाधव, प्रा.समीर घोडेस्वार, युवराज सूर्यवंशी, डी.के.चौधरी, शाहिद शेख, देवा पाटील, विनोद नाईक, व्ही.एन.पाटील, साजिद तडवी, योगेश पाटील, डी.आर.चौधरी, अतुल पाटील, पी.डी.पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन तथा आभार प्रा.समीर घोडेस्वार यांनी मानले.