समोरून येणाऱ्या बसला धडक दिल्याने मोटर सायकल स्वार जागीच ठार

0
25

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी

सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर सोमवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपड्या ते नाशिक जाणारी बसला समोरून येणाऱ्या मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी बस डेपो ची बस क्रमांक MH40. Y 5977 ही चोपड्याहून नाशिकच्या दिशेने निघाली होती पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटरसायक सायकलने चोपड्याला च्या दिशेने जात होता सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोपडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला मोटरसायकल स्वराने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला.

अपघाती भीषण होता ती मोटरसायकल शंभर मीटर पर्यंत जाऊन तिचे पाठ वेगवेगळे ठिकाणी पडून मोटरसायकल जळून खाक झाली होती बसमधील काही प्रवाशांच्या माहितीनुसार समोरून जलद गतीने येणाऱ्या मोटरसायकल स्वराला वाहकाने आरडाओरड करून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही मोटरसायकल बसला आढळली घटना समजतात पातोंडा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मयताचा छातीवर असलेला नाना नाव व मोबाईल क्रमांक वरून मोटरसायकल स्वार ची ओळख पटली होती तेव्हा धरणगाव पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचे पंचनामा करून शिवविच्छेदनासाठी नेण्यात आले तसेच अंमळनेर आगारातील अधिकाऱ्याने देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मयत हा एकुलता एक मुलगा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here