bus stand area : बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

0
13

जिल्हापेठ पोलिसात अज्ञाताविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, २० मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर असे की, जळगाव शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. पीडित मुलगी ही १९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगावातील नवीन बसस्थानक परिसरात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे.

नातेवाईकांनी घेतला सर्वत्र शोध

मुलीच्या नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळू शकली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here