बदनामीची भिती असह्य झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

0
12

साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी

मोबाईलमधे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याच्या प्रियकराकडून वारंवार मिळणा-या धमकीला वैतागून सतरा वर्षाच्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मयत मुलीच्या आईने पहुर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार जामनेर तालुक्यातील लाखोली येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हटले आहे की, संशयीत हा मयत मुलीला नेहमी तु माझ्यासोबत एकत्र रहा नाहीतर मी आपले मोबाईलमधे काढलेले फोटो व्हायरल करुन तुझी बदनामी करेन अशी धमकी द्यायचा ‘ त्या ‘ मुलाकडून आत्महत्या करणा-या मुलीला नेहमी त्रास सहन करावा लागत होता हा त्रास असह्य झाल्याने व बदनामीच्या भितीपोटी तिने अखेर गळफास घेत आत्महत्या केली होती.

दरम्यान , या 29 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर दुखा:तून सावरल्यानंतर मुलीच्या आई-वडीलांनी पहुर पोलिस स्टेशनला गु.र.न. 100 / 23 भा.द.वि. 306, 506 नुसार  गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक संजय बनसोड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here