साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयातील तहसिलदारांच्या दालनात बुधवारी, ८ नोव्हेंबर रोजी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वांचा परिचय करण्यात आला. हिरापूरचे नवनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील उर्वरित सर्व कमिटीतील सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कारासह स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आपला परिचय कमिटी समोर मांडला. त्यावेळी सर्व समितीतील सदस्यांनी समाजातील सर्व गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. आ.मंगेश चव्हाण आणि तालुकाध्यक्ष सुनील निकम यांचा विचार पुढे घेऊन जाण्याची शाश्वती दिली.
बैठकीनिमित्त आ.मंगेश चव्हाण यांनी समितीतील सदस्यांशी संवाद साधताना आपले विचार बैठकीत मांडले. आपल्या समाजातील गरिबांसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आपल्यापासून सुरुवात करण्याचा संकल्प करू या आणि आपल्यावर असलेले सामाजिक दायित्व पार पाडण्याचा निर्धार करू या, असे आवाहन केले. शासकीय योजना राबवितांना तांत्रिक बाजू समजावून घेत प्रशासनाला विश्वासात घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करणे समितीच्या हातात आहे. त्या दिशेने काम करणे त्या संवादातून आ.मंगेश चव्हाण यांची दूरदृष्टी व समाजातील गरजू जनतेसाठी काम करणे हे समितीमार्फत होईल, अशी आ.मंगेश चव्हाण यांनी शाश्वती दिली.